Traffic Police (PC - wikimedia commons)

आजपासून देशभरात नवरात्रोत्सवाला (Navratri) सुरुवात झाली आहे. आता पुढील 9 देवीची विविध रुपात पूजा केली जाईल व त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सणाने या उत्सवाची सांगता होईल. आता पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) या नवरात्रीसाठी वाहतुकीतील बदलाची घोषणा केली आहे. या नऊ दिवसांमध्ये शहरातील अनेक रस्ते बंद असतील तर काही ठिकाणी वाहतूक वळवली जाईल. उत्सवादरम्यान, भाविक चतुश्रृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराला भेट देतात. भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, तसेच वाहतुकीची कोंडी येऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

  • आप्पा बळवंत चौक-

आप्पा बळवंत चौक हे बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात येऊन, बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतुक चालु राहील. सदरचा बदल आवश्यकतेनुसार करण्यात येईल.

पर्यायी मार्ग

आप्पा बळवंत चौक, गाडीतळ पुतळा येथुन शिवाजी रोडने इच्छित ठिकाणी जाता येईल.

  • भवानी माता मंदीर-

रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅण्ड या दरम्यानचा भवानी माता मंदीरासमोरील महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळुन, सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजुंनी बंद करण्यात येणार आहे. या महात्मा फुले रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. वाहन चालकांनी पंडीत् नेहरु रोडवरील व इतर रोडवरील पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करावीत.

पर्यायी मार्ग

संत कबीर चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी, ए.डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पदमजी चौकी चौक-उजवीकडे वळून जुना मोटार स्टॅण्ड पर्यंत येऊन इच्छितस्थळी जावे.

ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकी समोरून भवानी माता मंदीर रस्त्यावरून जुना मोटार स्टॅण्डकडे जाणारे वाहन चालकांनी, भगवान बाहुबली चौकातुन जुना मोटार स्टँण्डकडे जावे. यासाठी मा.माणिकदास महाराज चौक ते भगवान बाहुबली चौक या दरम्यानच्या जाधव रस्त्यावरील एकेरी मार्ग वाहतूक निर्बंध नवरात्र उत्सव कालावधी पुरता शिथील करण्यात येत आहे.

रामोशी गेट येथुन जाणारे पी.एम.पी.एल. बसेसची वाहतुक सेव्हन लव्हज चौक येथून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौक, डावीकडे वळून खाणेमारुती चौक अशी सुरु राहिल. जेणेकरुन नवरात्र उत्सवादरम्यान भवानी माता मंदीर या भागात वाहतुक कोंडी होणार नाही.

  • तांबडी जोगेश्वरी मंदीर-

लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदीर या दरम्यानचे तांबडी जोगेश्वरी रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येत आहे. सकाळ प्रेस कडून जोगेश्वरी मंदीरकडे जाण्यास अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारचे वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदीराकडे वळण घेणाऱ्या वाहन चालकांनी सरळ सेवासदन चौक उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने आप्पा बळवंत चौक उजवीकडे न वळता सरळ शनिवारवाडा मार्गे इच्छित स्थळी जावे. (हेही वाचा: Marathi Dandiya Event: भाजपकडून मुंबईमधील काळाचौकी येथे 7 दिवसांच्या भव्य मराठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन; दररोज गिफ्ट म्हणून मिळणार आयफोन, जाणून घ्या सविस्तर)

पार्कींग

देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरीकांनी संभाव्य गैरसोय टाळणेसाठी त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करावीत.

टिळक पुल ते भिडे पुल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर,

मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन / कै. सतिश मिसाळ पार्कींग तळावर,

पुण्यात नवरात्रोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते बंद, पार्किंगमध्ये बदल-

  • चतुःश्रृंगी माता मंदीर-

देवीचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊन सेनापती बापट रोडवर वाहतुक कोंडी झाल्यास, पत्रकार नगर चौकाकडुन सेनापती बापट रोड जंक्शन कडे येणारी वाहतुक आवश्यकतेप्रमाणे शिवाजी हौंसीग चौकाकडुन सेनापती बापट रस्त्याचे डावे बाजुने एकेरी सोडण्यात येतील. सदर रस्त्यावर गर्दी वाढल्यास, आवश्यकतेप्रमाणे मंदिराकडे जाणारे रस्त्यावरील वाहने चतुःश्रृंगी मंदिराकडे न सोडता वेताळबाबा चौकातुन दिप बंगला चौक मार्गे, तसेच शिवाजी हौंसीग चौकातुन उजवीकडे वळुन ओम सुपर मार्केट मार्गे सोडण्यात येतील.

कॉसमॉस जंक्शनकडुन सेनापती बापट रोडवर येणारे भाविकांनी त्यांची वाहने पॉलिटेक्निक मैदानावर पार्कंगकडे जाण्यासाठी शिवाजी हौसिंग चौकातून डावे बाजुस वळुन कै. सावंत चौकातुन फिरोदीया पथ मार्गे घेवुन जावीत.

वीर चाफेकर चौकाकडुन चतुःश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येणारे वाहनचालकांनी त्यांची वाहने सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातुन डावे बाजुने थोरात चौकातुन दिप बंगला चौक मार्गे तसेच गणेशखिंड रोडवरील संगण्णा धोत्रे पथ व खाऊ गल्ली मार्गे पॉलिटेक्निक पार्कंग गेट कडे घेवुन जावे.

नागरीकांनी व वाहन चालकांनी वरील नमूद निर्बंध केलेल्या मार्गांवर येण्याचे टाळावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.