नवनीत राणा (संग्रहित संपादित प्रतिमा)

येत्या रविवारपासून देशात शारदीय नवरात्रोत्सवाला (Navaratri 2019) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर देवीची पूजा अर्चना यासोबतच गरबा आणि दांडियाची (Dandiya and Garba) धूम पाहायला मिळते. अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात खासदार नवनीत राणादेखील सहभागी झाल्या होत्या. उपस्थित असलेल्या महिलांसोबत राणा यांनीदेखील आपल्या नृत्याची झलक दाखवली.

प्रशिक्षणार्थी महिलांसोबत जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा नृत्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. नवनीत राणा यांनी ‘कमरीया’ गाण्यावर दांडिया नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नवनीत राणा यांनी, अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव केला त्यानंतर त्या अधिकच प्रकाश झोतात आल्या. (हेही वाचा: Navratri 2019: नवरात्रात देवीला वाहा या नऊ फुलांच्या माळा; जाणून घ्या प्रत्येकाचे रंग)

नवनीत राणा या एक सिनेअभिनेत्री असून त्यांनी आतापर्यंत 22 पेक्षा जास्त तेलुगू, कन्नड़ आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागची वर्षी देखील राणा असाच एका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या होत्या.