
नवी मुंबई मध्ये 24 वर्षीय व्यक्तीने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आरोपीने पीडीतेला नवी मुंबईच्या सानपाडा मधील एका लोकल लॉज मध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीतेच्या वडीलांनी मंगळवारी (15 ऑगस्ट) पोलिसांना सारा प्रकार सांगितला. आरोपी दीनदयाळ लक्ष्मण प्रसाद हा त्यांच्याकडे मोबाईल शॉप मध्ये काम करत होता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक वर्ष दीनदयाळ त्यांच्याकडे काम करत होता. पण त्याचं हे वागणं अनपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीनदयाळ अल्पवयीन मुलीकडे आधी मैत्री करण्यासाठी आला. हळूहळू जेव्हा तिचे वडील कामासाठी शॉपमधून बाहेर पडायचे तेव्हा तो मुलीला भेटण्यासाठी गळ घालत होता. आपलं प्रेम आहे सांगून तो तिला पटवण्याचा प्रयत्न करत होता. मुलीच्या स्टेटमेंट वरून 14 एप्रिलला तिच्या कडे दीनदयाळ आला आणि प्रेमाची कबुली देत तिच्या अंगलट येण्याचा प्रयत्न करू लागला. Court On Rape Of Live-In Partner's Daughter: POCSO न्यायालयाकडून लिव्ह-इन पार्टनरच्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा .
प्रेमाच्या नावाखाली दीनदयाळ तिच्याकडे फिजिकल रिलेशनशीपची मागणी करायला लागला. त्यानंतर तिला चूकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. यासाठी मुली नकार देत होती पण दीनदयाळचे प्रयत्न सुरूच होते. मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याचे पीडीतेच्या वडिलांना समजल्यानंतर तिला तो लॉज वर घेऊन गेल्याचंही त्यांना समजलं.
पोलिसांनी मंगळवारी रात्री दीनदयाळला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. सध्या लॉजच्या मालकाची देखील चौकशी सुरू आहे. एक अल्पवयीन मुलगी पालकांच्या संमतीशिवाय लॉजमध्ये आल्यानंतर प्रवेश कसा दिला याचा तपास सुरू आहे. कोर्टाने आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.