Navi Mumbai Traffic Diversion: नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणावरुन पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे 24 जून रोजी वाहतूक मार्गात बदल
Traffic | Representative Image (Photo Credits: Pixabay)

Navi Mumbai Traffic Diversion: डेप्युटी कमिशनर पोलीस यांनी कलम 144 लागू केला आहे. त्यामुळे 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित जमण्यास बंदी असणार आहे. हा नियम 21 जून ते 19 ऑगस्ट पर्यंत लागू करण्यात आला आहे. तर नागरिकांचे आयुष्य, सुरक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेला धोका पाहता समोर आलेल्या रिपोर्टसनंतर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी येत्या 24 जून रोजी वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर सिडको भवनाच्या येथे करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे वाहतूक मार्गात बदल केला जाणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन भाजपचे कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांकडून केले जाणार आहे. आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळाला डीबी पाटील यांचे नाव द्यावी अशी मागणी केली जात आहे.

नवी मुंबईतील पोलिसांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता मोर्चा काढण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र जवळजवळ 1 लाख आंदोलकांनी आम्ही शांततापूर्ण मोर्चा सिडको भवनावर येत्या 24 जून रोजी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादामध्ये राज ठाकरेंनी स्पष्ट केली त्यांची भूमिका; 'छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संयुक्तिक' असल्याचं व्यक्त केले मत) 

मुंबईहून पुण्याला जाणारी सर्व अवजड वाहने आणि हलकी वाहने ही ऐरोली टोला प्लाझा आणि म्हापे-शिळफाटा रोड येथून कळंबोळी सर्कल येथून पुण्याचा दिशेने जाण्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. तर पुण्याहून येणारी वाहने ही कळंबोळी येथील पुष्परथ पेट्रोल पंप वरुन सायन-पनवेल हायवे येथून तळोजा एमआयडी, रोडपाली आणि तेथून म्हापे-शिळफाटा रोड येथून ऐरोली टोल प्लाझा वरुन मुंबईत दाखल होतील असे सांगण्यात आले आहे.

सर्वच वाहनांना उरण फाटा रोड ते सीबीडी नंतर खारघर पर्यंत जाण्यास परवानगी नसणार आहे. तर जी वाहने जुन्या पुणे हायवे आणि गोवा हायवेने येणार आहेत त्यांना पालासपे फाटा रोडने कळंबोळी सर्कल येथून म्हापे-शिळवाटा रोड वरुन ऐरोली टोल प्लाझावरुन मुंबईत दाखल होतील.

तसेच सीबीडी-बेलापूर येथील वाहतूकीसह भारती विद्यापीठ-बेलपाडा रोड येथून उत्सव चौक येथे पोहचता येणार आहे. पण सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनाच्या येथून वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गाने कळंबोळीच्या दिशेने पुण्याला जाता येणार आहे.

नवी मुंबईतसह पाम बीच रोडवरील सर्व वाहतूक ही वाशी येथील अरेंजा कॉर्नर येथून ऐरोली टोल प्लाझाजवळ दाखल होण्यासाठी म्हापे रोडने वळवण्यात आली आहे. तर नवी मुंबई येथून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक पाम बीच रोड ते अरेंजा सर्कल सेक्टर17 आणि त्यानंतर खोपरखैराणे येथील बोनकोडेहून म्हापे पुल ते शिळफाटा आणि त्यानंतर कळंबोळी सर्कलवरुन पुण्याला जाता येणार आहे.त्याचसोबत ठाणे-बेलापूर येथील वाहतूक वळवण्यात आली आहे. तर म्हापे पूलावरुन मुंब्रा-पनवेल महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने वाहतूकीसाठी मार्ग मोकळा असणार आहे.