नवी मुंबई (Navi Mumbai) येथून एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. उसने दिलेले 17,000 रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तिने आपल्या मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे वाशी येथील नाल्यात टाकले. सुजित कुमार चौहान असे आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी असलेल्या मित्र रविंद्र मंडोतिया (Ravindra Mandotiya) याच्याकडून आरोपीने 17,000 रुपये उधार घेतले होते. दोघे एकमेकांचे मित्र होते.
आरोपी सुजित कुमार चौहान याने त्याचा मित्र रविंद्र यास मद्यपान करण्यासाठी निमंत्रीत केले होते. मद्यपान केल्यानंतर दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला. या दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी प्रकरण जावावर बेतले. आरोपीने मद्यधुंद होईपर्यंत रविंद्र यास दारु पाजली. तो मद्यधूंद होताच त्याने त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. घाव वर्मी लागल्याने रविंद्र याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीन मृतदेहाचे बारीक तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नाल्यात टाकले. (हेही वाचा, Jalna: 6 वर्षांच्या मुलाचा प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने आईनेच केली निर्घृण हत्या )
एपीएमसी (APMC) परिसरातील रहिवाशांनी दुर्गंधीची तक्रार केली आणि पोलिसांना सतर्क केले. तेव्हा पोलिसांनी शोध घेतला असता एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. जे निळ्या रंगाच्या वेवगेगळ्या पिशवीमध्ये भरलेले होते. पोलिसांना मृतदेहाचे तुकड्यामध्ये हात आणि पाय सापडले. परंतू डोके आणि धड आढळून आले नाही. हातावर हनुमानाची प्रतिमा आणि रविंद्र असा टॅटू आढळून आला.
पोलिसांनी मृत शरीराचे अवयव शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवले आणि आपला शोध सुरु ठेवला. पोलीस शोध घेत असताना पोलिसांना एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. ज्याच्या हातावर हनुमानाची मूर्ती आणि रविंद्र असेले लिहिलेले होते. पोलिसांनी हातावरील हनुमानाची प्रतिमा आणि रविंद्र असे लिहिलेला टॅटू यावरुन मृतदेहाची ओळख पटवली. अधिक तपासात पोलीस आरोपी सुजित कुमार चौहान याच्या पर्यंत पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या.