नवी मुंबईकरांचं (Navi Mumbai) मेट्रोचे (Metro) स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पुर्वी मेट्रो सुरु करण्याचा मानस अधिकाऱ्यांचा आहे. नवरात्रोत्सवादरम्यान नारी शक्ती सन्मान कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पंरतू रायगड प्रशासन लवकरच याची घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून नवी मुंबई मेट्रो उद्घाटन सोहळ्याबाबत निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Ghatkopar News: घाटकोपरमध्ये ठाकरे गटाकडून गुजराती बोर्डाची तोडफोड, उद्यानाबाहेर राडा)
नवी मुंबई मेट्रोचा उद्घाटन सोहळा हा 14 ऑक्टोबर किंवा 15 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढर हा पहिला 11 किलो मीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. या मार्गाचे काम दोन टप्प्यात पूर्ण झाले. मेट्रो सुरु करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये सीएमआयएस प्रमाणपत्र मिळालं आहे. तसेच सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनचं काम देखील पूर्ण झालं आहे.
नवी मुंबईत दोन किलोमीटर अंतरासाठी 10 रुपये तिकीट आणि 2 ते 4 किलोमीटर अंतरासाठी 15 रुपये तिकीट आकारण्यात येईल. तसेच तिकीट दर 5 रुपये वाढविण्याचा प्रस्ताव आहे. बेलापूर ते पेंढरदरम्यान प्रवासासाठी 40 रुपये तिकीट आकारण्याची शक्यता आहे.