Accident (PC - File Photo)

Kharghar Road Accident: लोणावळ्यातील एकवीरा आईचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खारघर येथे सोमवारी उशिरा मुंबई- पुणे मार्गावर भरधाव ट्रक चालकाने स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणाला धडक दिल्याने अपघात झाला.  स्कूटरवर दोन तरुण लोणावळ्यावरून घरी परतीला निघाले होते त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यास आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे मार्गावरून भरधाव ट्र्क जात होता.दसऱ्य़ाच्या आदल्या दिवशी लोणावळ्यातील एकवीरा देवी मंदिरात चार मित्र गेले होते. स्कूटरवरून ते परतीच्या प्रवासाला निघाले असताना, सायन पनवेल महामार्गावर ते कोपरी येथे पोहचल्यावर अपघात झाला.भरधाव ट्रक निष्काळजीपणाने स्कूटरला धडकला, स्कूटरवरील दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी एकाचा मृत्यू झाला.

चेंबूरमधील पांजरापोळ येथील गौतम नगर येथे राहणारा १७ वर्षीय सुमित संतोष परदेशी याचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती खार पोलिस ठाण्यात देण्यात आली.पोलिसांनी फरार ट्रक चालकाला शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष आणि सुमित हे चेंबुर परिसरातील रहिवासी आहे. अपघाताची कसुन चौकशी करण्यात आली आहे. या अपघातात स्कूटरला जोरदार धडक दिल्याने तीचा चेंदामेंदा झाला आहे.