संभाजी भिडे (Photo Credits: PTI)

आंबा प्रकरणात वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारकडून संभाजी भिडे यांच्यावरील दंगलीचे 6 खटले रद्द

नाशिकमधील एका सभेत "माझ्या शेतातील आंबे खाल्याने मुले होतात," असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. चौकशीअंती भिडे यांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी होताच भिडे यांना समन्स बजावूनही ते यापूर्वी तीन वेळा न्यायालयात हजर राहू शकले नव्हते. आज मात्र भिडे न्यायालयासमोर हजर झाले. त्यानंतर 15 हजाराच्या जातमुचलक्यावर भिडे यांना जामीन मंजूर करण्यात आला.