नाशिकच्या Om Mahajan ने बनवला World Record, केवळ 8 दिवस 7 तास आणि 38 मिनिटांत सायकलवरुन पार केले श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंतचे अंतर
Om Mahajan (Photo Credits: Twitter/ANI)

तुमच्यात जिद्द, दृढ आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळवू शकता. अशीच जिद्द उराशी बाळगून वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) करणा-या ओम महाजनने (Om Mahajan) सायकलवरुन 8 दिवस 7 तास 38 मिनिटांत श्रीनगर ते कन्याकुमारी हा प्रवास पार केला. मुख्य म्हणजे 3600 किमीचे अंतर इतक्या कमी वेळात पार करणारा हा जगातील सर्वात लहान सायकलिस्ट आहे. त्याचे वय 18 वर्ष इतके आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, डब्लूसीए रेकॉर्डमध्ये होणार आहे. त्याच्या या यशाने त्याच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या यशानंतर त्याच्या कुटूंबाने तसेच मित्रपरिवाराने त्याचे दणक्यात स्वागत केले.

मूळचा नाशिकचा असलेला ओम महाजन याने श्रीनगर आणि कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास खूप कमी वेळात पार केला आहे. हा संपूर्ण प्रवास 3600 किमी आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने केवळ 2 तासाची झोप घेतली.हेदेखील वाचा- New Zealand Police थिरकले बॉलिवूडच्या Kala Chashma गाण्यावर; माधुरी दीक्षित ने शेयर केला Video

या यशानंतर ओमने 'माझ्या काकांचा रेकॉर्ड कॉलोनियल पन्नू साहेब यांनी मोडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ही विक्रम आमच्या घरात आला आहे. खूप कमी वेळात हे अंतर सायकलवरुन पार केल्याने ओमही प्रचंड खूश आहे.

ओमने 13 नोव्हेंबर रोजी पहाटे पाचला श्रीनगरपासून सुरुवात केली. या मोहिमेत त्याने श्रीनगर- दिल्ली- झाशी- नागपूर- हैदराबाद- बेंगळुरू- मदुराई- कन्याकुमारी असा प्रवास केला. यापूर्वी ही मोहीम भरत पन्नू यांनी पूर्ण केली होती. त्यांनी हे अंतर 8 दिवस 9 तास 48 मिनिटांत पूर्ण केले होते, तर महेंद्र महाजन यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये हे अंतर 10 दिवस 9 तासांत पूर्ण केले होते. या दोघांचा विक्रम ओमने मोडीत काढला.