Nashik Onion Market: नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार, व्यापाऱ्यांचा संप मागे
Onion Market (Pic Credit - All India Radio News Twitter)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून पूर्ववत होणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकरला होता. नाशिकमधील पिंपळगाव आणि विंचूर बाजारसमितीमध्ये लिलाव सुरु होणार आहे. जे व्यापारी सलग 3 दिवस लिलाव बंद ठेवतील त्यांचे परवाना रद्द करण्याचा सहकार विभागाने इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर कांदा लिलाव पुन्हा सुरु होणार आहेत. (हेही वाचा - Government's Export Policy Of Onion: नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक; सरकारच्या निर्यात धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार)

1 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले होते. बीड , नाशिक , अहमदनगर जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत असून, शेतकरी आक्रमक झाले. तर, काही ठिकाणी कांद्याचा लिलाव देखील बंद पाडण्यात आले. यानंतर सरकारकडून इशारा देण्यात आला त्यामुळे पुन्हा लिलाव सुरु होणार आहे.

कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण होत आहे.  मराठवाड्यातील कडा बाजारपेठेत कांद्याला  प्रतिकिलो 25 रूपये दर मिळाला आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. कांद्याची निर्यात सुरू असताना कांद्याला 50 रुपयांचा भाव मिळायचा मात्र आता कांद्याची निर्यात अचानक रद्द केल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.