नाशिक बोअरवेल अपघात । Photo Credits: Twitter / ANI

नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) बेज शिवारातील बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षीय रितेश जवंशिग सोळंकीला बाहेर काढण्यात आज NDRF पथकाला यश आले आहे. दैव बलवत्तर म्हणून सुमारे 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला रितेश बचावला असून त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची स्थिती सामान्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील 5 किमी बेज शिवारामध्ये आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रितेश खेळता खेळता पडला. ही घटना मजुरीसाठी आलेल्या मजुरांनी पहिली आणि रितेशला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. रितेश बोअरवेलमध्ये 50 फूटांवर अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्थानिकांसोबत पोलिस आणि प्रशासनानेदेखील शर्थीचे प्रयत्न केले. रितेशला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या बाजूने जेसीबीने खोदकाम सुरू करण्यात आले.

ANI Tweet  

रितेशचे आई वडील हे मूळचे मध्य प्रदेशचे असून मजूरीच्या कामासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. आज बालदिनी रितेशचा झालेला अपघात हा धस्स करणारा होता.