आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे; 'दिव्यांग' पणावर मात करून नाशिक मध्ये  कविता भोंडवे  सांभाळत आहेत 2 गावांचे सरपंच पद
Kavita Bhondve | Photo Credits: ANI/ Twitter

इच्छा असते तेथे मार्ग दिसतोच, फक्त गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्तीची. नाशिकमध्ये 34 वर्षीय कविता भोंडवे (Kavita Bhondwe) या सरपंच देखील त्याचच एक उदाहरण आहेत. कविता या दिव्यांग आहेत. मात्र नाशिकमध्ये त्या 2 गावांमध्ये सरपंच म्हणून उल्लेखनीय काम करत आहेत. दिंडोरी तालुल्यातील दोन गावं त्यांच्या अख्यारिमध्ये आहेत.

कविता भोंडवे यांची सध्या सरपंच म्हणून दुसरी टर्म सुरू आहे. त्यांनी आपल्या कामाने ग्राम पंचायतींच्या कामांमध्ये चांगले बदल घडवून आणले आहेत. धाणेगाव (Dahegaon) आणि वागलूड (Waglud) मध्ये त्यांनी बेकायदेशीर गोष्टींविरूद्ध आवाज उठवला आहे.

ANI Tweet

ANI या वृत्तसंस्थेसोबत बोलताना त्यांनी संघर्षाची माहिती दिली आहे. सुरूवातीला लोकं मला कुबड्यांवर बघून माझी टिंगल करत होते. पण मी हार मानली नाही. गावातील ज्येष्ठांकडून, वडिलांकडून मी बरंच काही शिकली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी मी सरपंच झाली. अनेकांना इतक्या तरूण वयात मी सरपंच होणं हे रूचलं नव्हतं असे देखील कविता भोंडवे यांनी म्हटलं आहे.