अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'पोलिसांच्या जीवापेक्षा गाईचा मृत्यू अधिक महत्त्वाचा'
नसिरुद्दीन शाह, अभिनेता (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

प्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांनी बुलंदशहर हिंसाचारावर वादग्रस्त विधान (Controversial Statement ) केले आहे. आज देशात पोलीस अधिकाऱ्याच्या जीवापेक्षाही गायीच्या मृत्यू अधिक महत्त्वाचा बनला आहे. 3 डिसेंबरला उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर (BulandShahar)येथे झालेल्या हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची जमावाने हत्या केली होती. गोहत्येवरुन निर्माण झालेल्या तणावानंतर उसळलेल्या दंगलीत हा प्रकार घडला होता.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. या वेळी बोलताना शाह म्हणाले, 'आपण बुलंदशह हिंसाचारात पाहिले की, एका गायीचा मृत्यू ही बाब एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवापेक्षाही अधिक मोठी ठरली आहे.' पुढे बोलताना शाह यांनी म्हटले की, समाजात चौफेर विषमतेचे विष पसरले आहे. मला तर आता अशी भीती वाटू लागली आहे की, एखादा जमाव माझ्याही मुलांना घेरेन आणि त्यांना विचारेन तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम? माझ्या जवळ या प्रश्नाचे उत्तरच नाही. संपूर्ण समाजातच विष पसरले आहे.(हेही वाचा, अनुपम खेर यांच्यानंतर 'एफटीआयआय'ची धुरा नसिरुद्दीन शाह यांच्याकडे?)

दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहीलवर नुकतीच टीका केली होती. विराट कोहली हा चांगला खेळडू आहे. पण, तो सर्व खेळाडूंमध्ये असभ्य खेळाडू असल्याचे नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.