Narsing Udgirkar: वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या आलिशान Range Rover आणि Toyota Fortuner; किंमत फक्त 4 कोटी
Narsing Udgirkar | (Photo Credit -X)

Range Rover and Toyota Fortuner: राजकीय नेते आणि त्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चाचा विषय राहिला आहे. त्यात काही नेत्यांची संपत्ती निवडूक अर्जादाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे ज्ञात होते. काहींची निवडणूक जिंकल्यावर पण काही नेते मात्र असे असतात की, त्यांची संपत्ती मात्र निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर चर्चेत येते. वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर (Narsing Udgirkar) यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Latur Lok Sabha Election) उमेदवारी केलेल्या उदगीर यांनी चक्क एकाच दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांच्या आलीशान गाड्या बुक केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळ आणि जनतेत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

नरसिंग उदगीर यांचा सपशेल पराभव

लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे विजयी झाले. त्यांनी 61,881 मतांची आघाडी घेतली आणि पहिल्या क्रमांकाची मते घेत दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला . दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीर हे पराभूत झाले. त्यांना केवळ 42 हजार 225 मते पडली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. दरम्यान, उदगीर यांच्या पराभवाची जितकी चर्चा झाली नाही. त्याहून अधिक चर्चा त्यांनी खरेदी केलेल्या आलिशान गाड्यांमुळे आहे. (हेही वाचा, Ahmednagar News: अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक)

एकाच वेळी दोन गाड्यांचे बुकींग

नरसिंग उदगीर यांनी रेंज रोवर (Range Rover) आणि एक फॉर्च्यूनर (Toyota Fortuner) अशा दोन आलिशान गाड्या एकाच वेळी बुक केल्या आहेत. या दोन्ही गाड्यांची डिलीव्हरी जवळपास सहा महिन्यांनी होणार आहे. सोशल मीडियात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, गाड्यांच्या ऑर्डरवरुन सुरु असलेल्या चर्चा आण टीकेवरुन उदगीरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी आणि माझा भाऊ बांधकाम व्यवसायात आहोत. आमच्या वडिलांनी त्यांचे जे काही उत्पन्न आहे ते निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडले आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरीही आम्ही त्यांना एक सरप्राईज देणार होतो. ते आगोदरच ठरले होते. वडिलांना मुलांनी काही गिफ्ट दिले तर त्यात चूक काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

एक्स पोस्ट

नरसिंह उदगीरकर कोण आहेत?

नरसिंह उदगिरकर हे लातून लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाह होते. ते उद्योग अधिकारी म्हणून राज्य सरकारच्या सेवेत होते. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून सन 1982 मध्ये उद्योग अधिकारी म्हणून उद्योग संचलनालय मुंबई त्यांना नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, पदोन्नती मिळत त्यांना उपसंचालक पदापर्यंत मजल मारता आली. ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आपल्या व्यवसायात लक्ष घातले. त्यांच्यासोबत त्यांनी व्यंकटेश उदगीरकर आणि योगेश उदगीरकर यांनाही व्यवसायात आणले. सध्या ही दोन्ही मुले मुंबईत बांधकामक व्यवसायात आहेत.