nariman house photo Credit Wikimedia Commons and Instagram

26/11 Mumbai Terror Attack : दहा वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये ताज हॉटेल आणि आजूबाजुचा भाग प्रामुख्याने टार्गेट करण्यात आला होता. यामधील एक ठिकाणं म्हणजे ज्यू धर्मियांचं मुंबईतील निवासस्थान. छबाड हाऊस (Chhabad House)  किंवा नरिमन हाऊस (Nariman House)  या नावाने ते ओळखलं जातं. आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दहा वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर   नाव 'नरिमन लाईट हाऊस' (Nariman Light House)  ठेवण्यात येणार आहे.

नरिमन लाईट हाऊसमध्ये (Nariman Light House) 26/11 हल्ल्याच्या खाणाखुणा अजूनही ताज्या आहेत. स्मारकाच्या स्वरूपात रूपांतरीत करण्यात आलेल्या या इमारतीला आणि स्मारकाला आता सर्वसामान्य लोकंदेखील भेट देऊ शकणार आहेत.  26/11 Mumbai Terror Attack : तीन दिवस चाललेल्या या हल्ल्याचा असा होता घटनाक्रम

स्मारकाला भेट देण्याची इच्छा असणार्‍यांसाठी लवकरच छबाड ट्रस्टकडून ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. जेथे हल्ला झाला होता त्या मजल्यांवरही नागरिकांना भेट देण्यात येणार आहे. 26/11 Mumbai Terror Attack : 26/11 च्या आठवणींची आजही सोनाली खरेच्या मनात धास्ती !

26/11 मुंबई हल्ल्याच्या वेळेस 10 दहशतवादी घुसले होते. यापैकी दोन दहशतवादी एके 47 रायफलघेऊन घुसले होते.