Union Minister & BJP leader Kapil Patil (Photo/ANI)

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते कपिल पाटील (Kapil Patil) एका सभेत बोलताना म्हणाले की, येत्या 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होण्याची शक्यता आहे. हे काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) करू शकतात, कारण मोदी आहेत तर सर्व शक्य आहेत. आपण बटाटा, कांदा, तूर, मूग डाळ यांच्यामधून बाहेर पडल्यावरच हे शक्य होईल, असेही ते म्हणाले. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की, कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही.

पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी संयुक्त संसदीय अधिवेशन बोलावले होते. ज्यामध्ये त्यांनी काश्मीर ही देशाची अत्यंत गंभीर समस्या असल्याचे म्हटले होते. ही समस्या तेव्ह्चा संपेल जेव्हा पाकव्याप्त काश्मीर कधीतरी भारतात परत जोडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अशी कामे करण्यास सक्षम आहेत. पंतप्रधान मोदींनी आपले धाडसी निर्णय घेत राहिले पाहिजे. जसे त्यांनी हे पूर्वी केले आहे. मग ते CAA असो, कलम 370 किंवा 35A असो. (हेही वाचा: वाईन विक्रीच्या निर्णयावर इम्तियाज जलील यांची राज्य सरकारवर टीका, वाईन दुकानात विकल्यावर औरंगाबादची दुकानं फोडण्याचा निर्णय)

पीओके 2024 पर्यंत भारतात सामील होऊ शकते. सध्या त्याची आपण त्याची वाट बघू. कपिल पाटील इथेच थांबले नाहीत, ते म्हणाले की, लोक मटण 700 रुपये किलो आणि पिझ्झा 500 रुपयांना विकत घेऊ शकतात, पण कांदा 10 रुपयांनी आणि टोमॅटो 40 रुपयांनी महाग झाला की ते तक्रार करतात. कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान झाले नाहीत. या वस्तूंच्या किमती वाढण्यामागचे कारण समजले लोक त्यांना दोष देणार नाहीत.’ कपिल पाटील शनिवारी सायंकाळी ठाणे शहरातील कल्याण येथे एका कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी त्यांनी असे भाष्य केले.