प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - फेसबुक)

मुंबई मध्ये मागील काही महिन्यांपासून ड्र्ग्स रॅकेटप्रकरणी एनसीबी (NCB) विविध ठिकाणी धाडी टाकत ड्रग्स पेडलर्सना ताब्यात घेत आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांची नावं देखील उघड झाली आहेत पण काल एनसीबीच्या या कारवाईमध्ये एका 19 वर्षीय मुलाला देखील अटक झाली आहे. अयान सिन्हा असे त्याचे नाव असून तो कॉलेज ड्रॉपआऊट विद्यार्थी आहे. एनसीबीने काल त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत 2.30 लाख रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. घरात एनसीबीच्या अधिकार्‍यांना पाहून त्याने त्यांच्या अंगावर 2 पाळीव कुत्रे सोडण्याचादेखील प्रयत्न केला होता मात्र एनसीबी अधिकार्‍यांनी अशा परिस्थिती मध्येही काम सुरूच ठेवले आणि अयानच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान एनसईबीच्या कारवाई मध्ये अयानच्या घरी त्याने संगणकाच्या सीपीयू मध्ये ड्रग्स लपवले होते. तर एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार तो पश्चिम उपनगरामध्ये खार, वर्सोवा, वांद्रे येथे काही कलाकारांना आणि उच्चभ्रू वस्तीतील लोकांना ड्रग्सचा पुरवठा करत होता. काल कोर्टात अयानला सादर केल्यानंतर 4 दिवसांची एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे.

ANI Tweet

मिड डेच्या रिपोर्ट नुसार, अयान सिन्हाच्या घरी करण्यात आलेली कारवाई एका टीप च्या माध्यमातून करण्यात आली होती. अयान सिन्हा कॅनडा, अ‍ॅम्स्टरडॅम या देशांमधून ड्रग्स मिळवत होता. काल अयानच्या घरातून त्याचा मोबाईल फोन, ड्रग्स मोजण्याचे मशीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एनसीबी अधिकार्‍याच्या माहितीनुसार अवघा 19 वर्षांचा मुलगा इतकं मोठं रॅकेट चालवू शकत नाही यामध्ये काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील काही नावांचा आता पुन्हा तपास केला जाणार आहे. यामध्ये काही ए लिस्टर कलाकार एनसीबीच्या रडार वर असल्याचं म्हटलं जात आहे.