Nandurbar Bus Accident : नंदुरबार मध्ये ट्रॅव्हल बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, 35 प्रवासी जखमी; बचावकार्य सुरू
Bus fell into gorge in Maharashtra (photo Credits: ANI)

महाराष्ट्रात नंदूरबार (Nandurbar जवळ जळगाव येथून निघालेल्या एका ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस नंदूरबार जवळील Khamchoundar गावातील दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 अन्य प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. हा अपघात पहाटे 3 च्या सुमारास झाला असून सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती नंदूरबारचे एसपी महेंद्र पंडीत ( Mahendra Pandit, SP Nandurbar)यांनी दिली आहे. सध्या जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही ट्रॅव्हल बस जळगाव ते सुरत अशी प्रवास करणार होती. यामध्ये प्रवास करणारे अनेकजण हे जळगावचे रहिवासी आहेत.

ANI Tweet

पहाटे बस अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस, रूग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन मदत यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या आहेत. बस सउमारे 40 फूट दरीत कोसळल्याने त्याची भीषणता अधिक आहे. BEST Bus Accident In Mumbai: चेंबूर स्टेशन जवळ बेस्ट बस चालकाला हार्ट अटॅक आला अन वाहनावरील ताबा सुटला, सारे प्रवासी सुरक्षित.

मागील रविवार रात्र ते सोमवार पहाटे पर्यंत काही तासांच्या अवघीमध्ये पुणे- सोलापूर हायवे या 30 किमीच्या रस्त्यावर देखिल 3 विविध अपघात झाल्याची नोंद आहे. या अपघातांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले होते.