BEST Bus Accident In Mumbai: चेंबूर स्टेशन जवळ बेस्ट बस चालकाला हार्ट अटॅक आला अन वाहनावरील ताबा सुटला, सारे प्रवासी सुरक्षित
BEST Bus Accident In Mumbai। Photo Credits: Twitter/ @rajtoday

चेंबूर स्टेशन (Chembur Station) जवळ वसंत पार्क (Vasant Park) परिसरामध्ये आज (20 ऑक्टोबर) 11 च्या सुमारास एका विचित्र अपघात घडला आहे. बेस्ट चालकाला प्रवासादरम्यान हार्ट अटॅक (Heart Attack) आला आणि त्याचा बसवरील ताबा सुटला आहे. दरम्यान या बस चालकाचं नाव हरिदास पाटील (Haridas Patil) आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. बस मध्ये एक पोलिस कर्मचारी होता. त्याने पोलिस व्हॅनच्या मदतीने बस चालकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास मदत केली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. सुदैवाने बस चालक याची प्रकृती सुधारली असून त्यांची शुद्ध देखील आली आहे. हृद्यविकाराचा झटका जीवघेणा ठरण्याआधीच या Silent Signs च्या माध्यमातून ओळखा Heart Attack चा धोका

आज सकाळी हरिदास पाटील बस क्रमांक 381 चालवत होते. ही बस घाटकोपर पूर्व ते टाटा पॉवर स्टेशन चेंबूर दरम्यान प्रवास करते. 10.50 ला ही बस चेंबूर स्टेशन जवळ वसंत विहार येथे आली तेव्हा त्यांना त्रास सुरू झाला. हार्ट अटॅक आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस सिग्नलला धडकली. यामध्ये रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका भाजीच्या दुकानाचेही नुकसान झाल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब झोडगे यांनी मीडीयाला दिली आहे.

बेस्ट बस अपघाताची दृश्यं 

 

दरम्यान बसमध्ये अपघाताच्या वेळेस 9 प्रवासी होते. मात्र सारे सुरक्षित आहेत. अशी महिती देण्यात आली आहे. बस चालक हरिदास पाटील यांच्यावर राजावाडी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बेस्ट बस मर्यादीत स्वरूपात सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईकरांसोबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नोकरदार यामधून प्रवास करतात. मात्र सार्‍यांनाच मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.