Accident (PC - File Photo)

नांदेडमध्ये (Nanded Accident) पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील दुचाकी कारवर अदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. नांदेड शहरालगत (Nanded City)  असलेल्या हसापूर बायपासवरील मामा चौक परिसरात ही घटना घडली आहे. सदर घटनेत रोहित मुदिराज असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिना निमित्त मित्रांनी मोटार सायकल रॅली काढली होती. या रॅलीत रोहित देखील शामिल झाला होता. मयत रोहित मुदिराज हा काँग्रेस पदाधिकारी व्यकंट मुदिराज यांचा मुलगा होता. अपघाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (हेही वाचा - Vrindavan Building Balcony Collapsed: वृंदावनमध्ये बांके बिहारी मंदिराजवळ इमारतीची बाल्कनी कोसळली, 5 जणांचा मृत्यू (Watch Video))

रोहित हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारला दुचाकी धडकली. दुचाकी जास्त वेगात असल्याने धडकेत रोहित उंच हवेत फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय.  या भीषण अपघातात कारचा आणि दुचाकीच्या काही भागाचा चुराडा झाला. दरम्यान या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील पहायला मिळाले. पोलिसांनी या ठिकाणी वेळीच हजेरी लावत परिस्थीती हाताळली.

दरम्यान राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण हे मोठ्याप्रमाणावर वाढले असून या अपघाताला वेग आणि रस्त्याची खराब स्थिती ही कारणीभूत आहे. यामुळे लोकांनी वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.