नागपूर: मायो हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या 5 पैकी 3 कोरोना संशयित रुग्ण परतले; Isolation Ward बाहेर पोलिस तैनात
Nagpur Hospital | (Photo Credits: ANI)

नागपूरातील (Nagpur) मायो हॉस्पिटल (Mayo Hospital) मधून 5 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बेपत्ता झालेल्या 5 पैकी 3 कोरोना संशयित रुग्ण परत आले असल्याची माहिती नागपूर कलेक्टर आणि जिल्हा दंडाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. पुन्हा अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी विलगीकरण विभागाबाहेर (Isolation Ward) पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 5 पैकी रुग्णांपैकी एकाला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे तपासणीतून सिद्ध झाले होते. त्यामुळे आता केवळ एका संशयित रुग्णाचा शोध सुरु आहे. (नागपूर येथील मायो हॉस्पिटलमधून कोरोना संशयित 5 रुग्ण बेपत्ता)

संशयित चार रुग्णांचा तपासणीचा रिपोर्ट अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळे त्यांना सध्या तरी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिंबधात्मक उपाययोजना म्हणून  नागपूरातील सर्व सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल आणि पब्लिक गार्डन 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ANI Tweet:

पुण्यात 10, नागपुरात 3, मुंबईत 4, ठाण्यात 1 तर नगरमध्ये 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 19 आहे. तर देशात कोरोनाचे एकूण 83 रुग्ण आहेत. भारतात कोरोनाने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत.

राज्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील सर्व जिम आणि स्विमिंग पूल्स 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.