
Matrimonial Site Fraud: नागपूर (Nagpur) मध्ये 27 वर्षीय तरूणीला 30 वर्षाच्या नेहाल पाटील (Nehal Ravindra Patil) या तरूणाने लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये विविध हॉटेल्स वर तरूणीच्या पेयांमध्ये गुंगींचं औषध टाकून तिचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. त्या तरूणाने तिचे काही नग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडिओ देखील शूट केले आहेत. वर्षभरापूर्वी दोघांची एका मेट्रोमेनी साईट वरून ओळख झाली होती. फोन वर बोलून झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटायला सुरूवात केली. तरूणाने मुलीच्या पालकांची भेट घेऊन तिला लग्नाची मागणी देखील घातली होती.
कोराडी येथील एका हॉटेलमध्ये वेळ घालवल्यानंतर, दोघेही मानकापूर येथील एका हॉटेलमध्ये गेले, जिथे त्याने तिला पेयात गुंगींचं औषध मिसळल्यानंतर तिचे व्हिडिओ काढले. नंतर तरूणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि शाब्दिक बाचाबाची दरम्यान तिला मारहाणही केली. पीडितेने पाटीलविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी कोराडी पोलिसांकडे धाव घेतली. या तरूणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: Navi Mumbai Crime News: मॅट्रिमोनियल साइटवर भेटलेल्या पुरुषाचा नवी मुंबईतील महिलेवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल .
दरम्यान या प्रकरणाबद्दल अधिक माहिती असलेल्यांना पोलिस प्रशासनाने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पुढे येऊन माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. या घटनेमुळे ऑनलाइन वैवाहिक संवादात जागरूकता आणि सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित होते जेणेकरून व्यक्तींना अशाच परिस्थितींपासून वाचवता येईल.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291