Nagpur Shocker: सिगारेट पिताना रोखून पाहिल्याच्या रागात तरूणीने घेतला 28 वर्षीय व्यक्तीचा जीव !
Smoking | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

नागपुर (Nagpur) मध्ये एका मुलीला तिच्या मैत्रिणींसोबत 28 वर्षीय मुलाच्या खूना प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी मुलीकडे पान शॉप वर तिला रोखून पाहिल्याच्या रागात त्या मुलीने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. टाईम्स ओफ़ इंडिया च्या रिपोर्ट्सनुसार, जयश्री पांढरे या मुलीचा रणजीत राठोड सोबत वाद झाला. पान शॉप वर तो देखील सिगारेट घेण्यासाठी आला होता. दरम्यान ही घटना नागपूर मधील मनेवाडा सिमेंट रोड वरील आहे.

रणजीत राठोड ने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये जयश्री सिगारेटचा धूर त्याच्या दिशेने फेकत आहे तसेच त्याला काही अपमानास्पद टीपण्णी करत आहे. या व्हिडिओ मध्ये राठोड देखील तिला प्रत्युत्तर करत असल्याचं दिसत आहे. यावेळी जयश्री सोबत तिची मैत्रिण सविता सायरे देखील होती.

बघता बघता वाद वाढत गेला. जयश्री ने तिचा मित्र आकाश राऊत आणि जीतू जाधव ला बोलावून घेतलं. त्यांनी राठोडला जबाब विचारला. राठोड पान शॉप वरील वादा वादीनंतर निघाला होता पण जयश्रीच्या मित्रांनी त्याला महालक्ष्मी नगर मध्ये एका बीअर शॉप वर गाठून थांबवलं. त्यानंतर पुन्हा राडा झाला आणि त्यामध्येच राठोडचा खून झाला.

सीसीटीव्ही फूटेज मध्ये जयश्री राठोडवर एकापाठोपाठ एक वार करत असल्याचं दिसत आहे. या हत्येनंतर जयश्री आपल्या मित्रमंडळींसोबत दत्त वाडी आणि नंतर कमलेश्वर च्या मोहपा मध्ये पळून गेल्याचं दिसत आहे.

TOI,शी बोलताना सिनियर इन्स्पेक्टर कैलाश देशमाने म्हणाले जयश्रीला पोलिसांनी तिचे मित्र आकाश आणि सविता सोबत अटक केली आहे. अजूनही या प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फूटेज आणि राठोडच्या फोन मधील फूटेज महत्त्वाचे आहे.