नागपूर- रत्नागिरी महामार्गाचे (Nagpur Ratnagiri Highway) काम सुरू असताना आता तेथेही महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रिये दरम्यान मोबदल्यावरून शेतकर्यांनी विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मध्ये निमशिरगावात एका शेतकर्याने स्वतःच्या मालकीची पावणे तीन एकर जागा या प्रकल्पामध्ये जात असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याने चौपट दराने जमिनीची किंमत दयावी अथवा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या शेतकर्याचं नाव अविनाश कडोले आहे.
नागपूर रत्नागिरी भूसंपादनामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. अविनाश ने आपण भूमीहीन होणार असल्याचं म्हणत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्याने अंगावर रॉकेलचा कॅन ओतून स्वट्तःला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित लोकांनी दक्ष होत त्याला वेळीच सावरल्याने मोठा अनर्थ टळला.
महामार्गासाठी संपादित केल्या जाणार्या जमिनीला चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. नक्की वाचा: Farmers Suicide: कर्जमाफी होऊनही एकट्या मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यांत 805 शेतकऱ्यांची आत्महत्या.
रत्नागिरी ते नागपूर या 945 किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास 907 किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपट दराने झालेले आहे. त्यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा 38 किलोमीटरच्या रस्त्यासाठी देखील चौपट दराने मोबदला देऊनच जमीन संपादित करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.