Nagpur Metro's Aqua Line च्या पहिल्या भागाचं लोकार्पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'नागपूर मेट्रो'चं उद्घाटन; जाणून घ्या स्थानकं, तिकीट दर ते फेर्‍याचं वेळापत्रक
Nagpur Metro Project | Photo Credits: Twitter

Aqua Metro Project: मुंबई पाठोपाठ आता नागपूरमध्येही मेट्रो नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे.नागपूर मेट्रो अ‍ॅक्वा लाईनचा (Nagpur Metro's Aqua Line) पहिला भागाला आज (28 जानेवारी) सुभाषनगर मेट्रो स्थानकावर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ लिंकच्या मदतीने नागपूर मेट्रो प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवत त्याचे लोकार्पण केले. या वेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांचीदेखील उपस्थिती होती. आजपासून मेट्रो अ‍ॅक्वालाईन ही नागपूरकारांसाठी देखील खुली करण्यात येणार आहे. नागरपूरचे मेट्रो स्टेशन सजणार भव्यदिव्य अशा शिल्पाकृतींनी, पाह काय होणार विशेष बदल.  

आज 28 जानेवारी दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून महामेट्रोच्या ॲक्वा लाईनवरील प्रवासाचा आनंद नागपूरवासियांना घेता येणार आहे. प्रवासी सीताबर्डी ते लोकमान्य नगर (एकतर्फी) प्रवास 20 रूपयांमध्ये तर झांशी राणी चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, सुभाष नगर आणि वासुदेव नगर यातील कुठल्याही स्थानकापर्यंतचा प्रवास 10 रूपयांमध्ये करू शकणार आहेत.

नागपूर मेट्रो  

29 जानेवारीपासून नागपूरात अ‍ॅक्वा लाईनवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. 11 किमीच्या या अ‍ॅक्वालाईनवर6 मेट्रोची स्थानकं असतील. दर 30 मिनिटांनी मेट्रोची फेरी असेल. नागपूर शहरातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था,वसाहती सोबतच शहरातील दक्षिण-उत्तर भागातील कनेक्टीव्हिटी सुधारण्यासाठी मदत होणार आहे. किमान 10 ते 30 रूपये असे या मेट्रोचे तिकीटाचे दर असतील. दरम्यान शहरामध्ये वाहतूकीला चालना देणार्‍या या प्रकल्पाबद्दल नागपूरवासियांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.

लोकमान्य नगर, बन्सी नगर, वासूदेव नगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर, अंबाझारी लेक व्ह्यू, लाड स्क्वेअर, शंकर नगर, इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी स्थानक असेल. उर्वरित 5 स्थानकं एप्रिल 2020 पर्यंत नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत.