नागपूर मध्ये वाढदिवसाची पार्टी उरकून घरी जाणार्या मद्यधुंद अवस्थेतील चालकाने फूटपाथ वरील 17 जणांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान मधील बगाडिगा जमातीमधील एक पुरूष आणि स्त्री मृत्यूमुखी पडली आहे. तर 15 जण जखमी अवस्थेमध्ये आहेत. धडक दिलेल्या कार मध्ये सहा मित्र पार्टी संपवून एका ढाब्यावरून परतत होते. ही घटना दिघोरी टोल नाक्यावरील आहे. दरम्य्यान कारचालक हा भूषण लांजेवार होता. तो क्वालिफाईड फायर इंजिनियर आहे.
Hyundai Verna मधून भूषण सोबत त्याचे मित्र देखील होते. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. हे सआरे इंजिनियर किंवा पदवीधर होते. दरम्यान त्यांच्यावर कलम 304 (II)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने त्यांना 19 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भूषण याने घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी फूटपाथवरील लोकांच्या अंगावरून गाडी मागे-पुढे नेल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पती गमावलेल्या स्त्रीने गाडी वेगान जाण्यापूर्वी त्याने आमच्या अंगावरून मागे पुढे नेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मृत महिलेचं नाव कांतीबाई बगाडिया (42) तर मृत पुरूषाचं नाव सीताराम बगाडिया असल्याचं म्हटलं आहे.
हॉस्पिटल मध्ये 7 जण क्रिटिकल अवस्थेमध्ये दाखल करण्यात आले आहेत तर 8 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आले आहे. बगाडिया जमातीतील 30 पैकी काही सदस्य थोड्याच अंतरावर झोपले असल्याने ते सुरक्षितपणे बचावले. टोल प्लाझाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारला अडवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलिस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हद्दीत जॉयराईडला जाण्यापूर्वी हे तरुण त्यांच्यापैकी एका मित्राचा वाढदिवस साजरा करून आले होते. ते हुडकेश्वर येथील ढाब्यावर दारू पिऊन आले होते.