Nagpur Crime: नागपूरात वाळू तस्करांचा अधिकाऱ्यांवर हल्ला, तिघांना अटक
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

नागपूरमध्ये (Nagpur) वाळू तस्करांची हिंमत देखील वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात (Ramtek Revenue Department) वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. वाळू तस्करांनी रामटेक महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना रेती वाहतुकीवरील कारवाई दरम्यान जीवे मारण्याचा प्रयत्न (Nagpur Crime) केलाय. या वाळू माफियांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. वंदना सवरंगपते असं उपविभागीय अधिकारी यांचं नाव आहे.  ( Mumbai Crime Branch कडून अंधेरी मध्ये कॉल सेंटर वर छापेमारी; विनापरवाना अमेरिकन नागरिकांना विकत होता औषधं!)

रामटेक घोटीटेक शिवारात ही घटना घडली होती. तेथे ओव्हल्लोड ट्रकची वाहतूक होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी या वाळू माफियांचं वाहन थांबवण्यात प्रयत्न केला. तेव्हा ट्रक चालकांनी पळ काढला. तसंच त्यांनी अधिकाऱ्यांच्या पथकाच्या वाहनासमोर वाहनं देखील लावली होती. त्यांनी शासकीय कामात अडथळा आणलाय. हा सगळा प्रकार सउपविभागीय अधिकारी यांच्या वाहन चालकाच्या कॅमेरात कैद झालाय.

वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनानं प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू केले आहेत. माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय. वाळूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी देखील शासनाने कारवाई सुरू केली.