Photo Credit- Pixabay

Nagpur Shocker: नागपुरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे इंजिनीअरिंगला (Engineering ) असणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शहरातील कपिल नगर भागात ही घटना घडली. उत्कर्ष डाखोळे असे आरोपीचे नाव आहे. (Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष हा अभ्यास ठिक नव्हता. इंजिनीअरिंगच्या अनेक विषयात तो नापास झाला होता. त्याची अभ्यासातील परिस्थीती पाहून त्याच्या पालकांनी त्याला इंजिनीअरिंग सोडून दुसरे काहीतरी करण्यास सांगितले. मात्र, त्याने पालकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पालकांनी दबाव दिल्यामुळे त्याने त्यांचा खून केला. कुटुंबात या तिघांशिवाय, एक बहिणही आहे. मात्र, घटनेवेळी उत्कर्षने तिला नातेवाईकांच्या घरी पाठवले होते. घरी कोणी नसताना त्याने पालकांची हत्या केली.

लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे अशी मृतांची नावे आहेत. 1 जानेवारी रोजी सकाळी कपिल नगरमधील एका घरात दोन मृतदेह पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात दोन रक्ताने माखलेले मृतदेह आढळले. २६ डिसेंबर रोजी उत्कर्षने आधी आईचा गळा दाबून खून केला, त्यानंतर वडिलांचा वार करून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

आरोपी मुलाने आपल्या बहिणीला घटनेची माहिती होऊ नये यासाठी आई आणि बाबा ध्यानासाठी गेले असल्याचे सांगितले. तेथे त्यांना मोबाईल फोन आणण्यास परवानगी नाही असे सांगितले होते. पोलिसांनी आरोपी उत्कर्ष डाखोळे याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे.