नागपूर: 12 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

अवघा महाराष्ट्र होळीच्या रंगात रंगत असताना या आनंदाचा बेरंग करणारी घटना नागपूर (Nagpur) येथून पुढे आली आहे. इथे एका 12 वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर (Little Girl) 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizen ) बलात्कार केल्याची घटना घडली. शैलेंद्र हिरामण गजभिये असे आरोपीचे नाव आहे. तो टायर व्रिकिचा व्यवसाय करतो. ही घटना शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात घडली. घरासमोर खेळत असलेल्या पीडितेला आरोपीने मॅगी खायला देण्याचे आमिष दाखवत घरात बोलवले. पीडिता घरात येताच त्याने तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतू, आरोपी बधला नाही. त्याने पीडितेच्या आई आणि बहिणीचा खून करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूवर बलात्कार, नवरा, दीराचे कृत्य; सासू-सासऱ्यांकडून दाराला कडी)

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या घटनेनंतर आरोपी पीडितेसोबत हे कृत्य वारंवार करत असे. डिसेंबर महिन्यात आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपी पीडितेसोबत हे कृत्य वारंवार केले. पत्नी घरात नसताना आरोपी पीडितेसोबत हे कृत्य करत असे. दरम्यान, परिसरातील महिलांना आरोपीबाबत शंका आली. या महिलांनी पीडितेच्या आईला त्याबाबत कल्पना दिली असता हा प्रकार पुढे आला.