
विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्यामुळे विदर्भात तिसऱ्या दिवशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात 148 गावांसह एक लाख नागरिकांना बसला पुराचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विदर्भात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच राज्य सरकारने निर्णयशून्यता बाजुला सारत तातडीने मदत करावी, ही माझी विनंती आहे. सध्या पूरग्रस्तांना राहायला घर नाहीत आणि शेती पूर्णत: उद्धवस्त झाली आहे. संकट मोठे असले तरी तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील महालगाव-धापेवाडा आणि बिरसोला, कासा येथे भेटी दिल्या आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. निवेदने स्वीकारली. पूर्व विदर्भातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. केवळ आजपुरते नाही, तर अनेकांचे भविष्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली, तरच त्यांना पुढच्या काळासाठी उभे करता येईल. पण, त्यासाठी आज तातडीने पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे. या सार्याच शेतकर्यांचे वेदना-दु:ख मोठे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरातून कारभार', विरोधकांच्या आरोपावर परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रहार
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-
राहायला घरं नाहीत आणि शेती पूर्णत: उद्धवस्त झालेली. संकट मोठे असले तरी तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील. राज्य सरकारने निर्णयशून्यता बाजुला सारत तातडीने मदत करावी, ही माझी विनंती आहे.#vidarbhafloods pic.twitter.com/mO2lmTygF3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2020
भंडारा जिल्ह्याच्या उमरवाडा आणि तामसवाडी येथे देखील त्यांनी भेट दिली आहे. नागरिकांकडून निवेदन स्वीकारले आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे. विदर्भातील पुरानंतरची स्थिती फारच गंभीर आहे. अनेक ठिकाणी धान होणार नाही, अशी स्थिती आहे. काही ठिकाणी संपूर्ण शेतीच पाण्याखाली असल्याने पुन्हा पीक घेता येणार नाही. शेतकर्यांची व्यथा वेळीच समजून घ्यावी लागेल. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला, तेव्हा राज्यात आपले सरकार होते. सहा जीआर काढून नागरिक-शेतकर्यांना थेट मदत करण्यात आली होती, असेही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पूरग्रस्तांना घर बांधून देण्यासाठी, घर दुरूस्तीसाठी, खावटीसाठी मदत करण्यात आली होती. पायाभूत सुविधांसाठी सुद्धा मदत करण्यात आली होती. अगदी तसाच जीआर विदर्भासाठी काढला पाहिजे आणि थेट मदत दिली पाहिजे. यासाठी येणार्या अधिवेशनात शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यात येईल, असे अभिवचन त्यांनी दिले आहे.