Mutton (Photo Credits: Youtube)

आता कांद्यानंतर आणखी एक वास्तूच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहेत. मटणाची किंमत आता 100 रुपये प्रतिकिलोच्या दराने वाढली आहे. त्यामुळे बॉम्बे मटन डीलर्स असोसिएशनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पावसाळ्यात पूर आणि अवकाळी पावसामुळे अनेक बोकडांचा मृत्यू झाला. आणि त्यामुळेच मटणाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्याचे कारण देत मटण आता लवकरच एक लक्झरी वस्तू बनू शकते यात काही शंका नाही.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वीच दर प्रतिकिलो 500 रुपयांच्या आसपास वाढले होते. ख्रिसमसच्या अगदी आधी हा दर किलोमागे 600 रुपये झाला. काही विक्रेते म्हणाले की ते फेस्टिव्ह सीझन नंतर पुन्हा पूर्ववत होऊ शकतात, तर काही विक्रेत्यांचं म्हणणं आहे की शेजारील राज्यांतील खरेदीदार देवनार येथे गर्दी करत आहेत.

दर मंगळवार आणि शनिवारी, गुजरात आणि राजस्थानमधील सुमारे 20,000 ते 30,000 बकऱ्या देवनार येथे येतात, जो पश्चिम भारतातील सर्वात  मोठा कत्तलखाना आहे. गेल्या एका महिन्यापासून यातील सुमारे 70 टक्के शेळ्या कर्नाटक, केरळ आणि ग्रामीण महाराष्ट्रातील डीलर्सना विकल्या जात आहेत. “कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि मध्य प्रदेशातील दर महाराष्ट्रापेक्षा खूपच जास्त आहेत, त्यामुळे तिथले व्यापारी हे देवनार येथेच येत आहेत. या सर्वामुळे मटणाची भाववाढ झाली आहे,” असे एका व्यापाऱ्याने मुंबई मिररला  सांगितले.

बॉम्बे मटन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष शहनाज थनावाला यांनी मुंबई मीराला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की असोसिएशनने राज्य सरकार आणि बीएमसीला महाराष्ट्रातून बाहेरील डिलर्सला मुंबईहून खरेदी करण्यास परवानगी न देण्यास सांगितले आहे. “स्थानिक व्यापारासाठी आमचा पुरवठा मर्यादित असावा परंतु सरकार आमच्या अडचणीकडे लक्ष देत नाही. आम्हाला अशी भीती आहे की ही वाढ आमच्या व्यवसायात अडथळा आणू शकेल,” असे ते म्हणाले.