Mumbai's TISS Suspends PhD Student: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने एका पीएचडी विद्यार्थ्याला देशविरोधी कारवायांमध्ये (TISS suspends PhD student) सहभागी असल्याबद्दल दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. PSF-TISS च्या बॅनरखाली दिल्लीत आयोजित आंदोलनात विद्यार्थ्यांच्या सहभागाचा हवाला देत ही कारवाई करण्यात आली आहे. डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये डॉक्टरेट करत असलेल्या रामदास प्रिन्सवानंदन यांना TISS च्या मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रामदास हे डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम (PSF) शी संबंधित आहेत. 7 मार्च रोजी रामदास यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये पीएसएफ-टीआयएसएसच्या बॅनरखाली दिल्लीतील आंदोलनात सहभागी होताना संस्थेच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे म्हटले आहे. TISS ने 26 जानेवारीपूर्वी 'राम के नाम' सारख्या माहितीपटांच्या स्क्रीनिंगचाही उल्लेख केला. (वाचा -State Government: शासनाकडून शाळांना निर्देश, उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्यास सवलत)
हा अयोध्येतील राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अपमान असल्याचे म्हटले होते. गेल्या जानेवारीत TISS कॅम्पसमध्ये बंदी घातलेला बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवल्याचा आणि 'वादग्रस्त अतिथी स्पीकर'ना आमंत्रित करून भगतसिंग मेमोरियल लेक्चर (बीएसएमएल) आयोजित केल्याचा आरोपही विद्यार्थ्यावर करण्यात आला आहे.
बेकायदेशीर कामांमध्ये हेतुपुरस्सर सहभाग -
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यार्थ्याने जाणूनबुजून अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. हे उपक्रम राष्ट्रहिताचे नाहीत. विद्यार्थ्यांना अशा क्रियाकलापांमध्ये गुंतण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या देशद्रोही आणि बदनामीच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत.
PUBLIC NOTICE pic.twitter.com/UG5nweaAfh
— TISS - Tata Institute of Social Sciences (@TISSpeak) April 20, 2024
18 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या निलंबनाच्या आदेशात TISS ने म्हटले आहे की, समितीने तुम्हाला संस्थेतून म्हणजेच TISS ला दोन वर्षांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली आहे. तुमचा प्रवेश सर्व TISS कॅम्पसमधून प्रतिबंधित केला जाईल. ही शिफारस सक्षम अधिकाऱ्याने स्वीकारली आहे. केरळचा रहिवासी विद्यार्थी रामदास याने निलंबनाविरोधात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.