महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढत आहे. परंतु आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. त्यानुसार मुंबईत सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा डबलिंग रेट (Doubling Rate) म्हणजेच दुप्पटीने वाढणारा आकडा 50 दिवसांवर पोहचल्याची माहिती शनिवारी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट कमी झाल्याने यापुढील लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता मिळू शकते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. मे महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांत ते 50 दिवसांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाकाकडून सर्वात मोठी कामगिरी करण्यात आल्याचे ही डॉक्टरांनी पुढे म्हटले आहे.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा डबलिंग रेट कमी आहे. मात्र कल्याण-डोंबिवली येथे 12 दिवसांवर हा डबलिंग रेट पोहचला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्याचसोबत ठाण्यात ही फक्त दिवसात 12 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या ठाण्यातील कोरोनाच्या डबलिंग रेट बाबत बोलायचे झाल्यास तो 20 दिवसांवर आला आहे. मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत ठाण्यात कोरोनाचे 6,132 रुग्ण, जुन महिन्याच्या 9 तारखेपर्यंत 12,053 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाल्याचे समोर आले आहे.(मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचे COVID19 मुळे निधन)
कोरोनाबाधितांचा आकडा अनलॉक1 नंतर अधिक वाढत चालला आहे. परंतु नागरि अधिकाऱ्यांकडून कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 27-30 दिवसांवर आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यास त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सुद्धा शोधत यापुर्वीपासून घेतला जात होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.(COVID19 मुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांना पोलिसांचा इशारा)
तसेच मिरा-भायंदर आणि वसई-विरार येथे कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट अनुक्रमे 15 आणि 17 दिवस असा आहे. या दोन्ही ठिकाणी मे महिन्यापर्यंत डबलिंग रेट 10-12 दिवस असा होता. मात्र जुनच्या मध्यापर्यंत तो 17 दिवसांवर पोहचला होता. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तो 15 दिवसांवर पोहचल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.