मुंबई (Mumbai) शहरातील मालाड (Malad) येथील एका निवासी संकुलाच्या जिममध्ये (Gym ) एका महिलेचा विनयभंग (Molesting a Woman) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका 35 वर्षीय फिटनेस ट्रेनरला (Fitness Trainer) पोलिसांनी अटक केली आहे. एका 25 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली. जो गेल्या चार वर्षांपासून जिममध्ये काम करत होता. असे चारकोप पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपीने प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. असे प्रकार अनेक वेळा घडले होते, असेही तिने म्हटले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, शाळेत जाणाऱ्या मुलीला रस्त्यात अडवून केला Propose, नकार दिल्याने मारली थप्पड, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
जीममध्ये शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. त्याचा हेतूच हा असतो की, चोरीमारीच्या घटना घडू नयेत. ट्रेनिंगच्या नावाखाली अथवा इतर कोणत्याही हेतुने कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चुकीच्या हेतूने स्पर्ष करु नये. तसे काही घडलेच तर ते सीसीटीव्हीमध्ये कैद व्हावे. तसेच, एखादा व्यक्ती चुकीचा फॉर्म मारुन अपघात घडत असेल तर ते टाळता यावे असाही त्याचा उद्देश असतो. परंतू, इतकी काळजी घेऊनही विनयभंगासारख्या घटना घडत असतील तर ते धक्कादायक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, कोरोना काळानंतर नागरिकांचा आपल्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. नागरिक सजग झाले असून, अधिक सकस आहार घेणे. व्यायाम करणे. व्यायामासाठी जीमला प्राधान्य देणे अशा गोष्टी ते करु लागले आहेत.