Mumbaicha Raja Ganeshotsav Mandal To Help Tiware Dam Accident Victims (Photo Credits: File Image)

रत्नागिरी जिल्ह्याच्या (Ratnagiri) चिपळूण (Chiplun) तालुक्यातील तिवरे (Tiware Village) धरण फुटल्याने पाणलोट क्षेत्रातील जवळपास सात गावांमध्ये पाणी शिरले होते. या अचानक उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावातील तब्बल 32 कुटुंबांना फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व मालमता हानी झाली होती. यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendr Fadnavis) यांनी धरणफुटी ग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर केली होती, यासोबतच गावाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतला होता, याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लालबाग (lalbaug) परिसरात स्थित मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) गणेशगल्ली (Ganeshgalli)  सार्वजनिक उत्सव मंडळाने काही दिवसांपूर्वी एक उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये धरणफुटी ग्रस्तांना मंडळाच्या वतीने 5 लाख रुपयांचे देणगी समर्पित करून त्यातून तिवरे गावात जीवनोपयोगी सामग्रीचे वाटप करण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या 40 सभासदांनी एकत्र येऊन तिवरे गावाला भेट दिली तसेच या आपत्तीला बळी पडलेल्या 32 कुटुंबाना मदत करण्यात आली. यावेळी तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या जीवनोपयोगी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप सुद्धा केले गेले, याबाबत मंडळाचे सभासद अद्वैत पेढांकर यांनी DNA ला अधिक माहिती देताना सांगितले की, आम्ही गावकऱ्यांशी बोलून त्यांना पैशांची मदत हवी आहे का याबाबत विचारणा केली होती मात्र त्यावेळी मिळालेले पैसे वापरून काही खरेदी करत बसण्याएवढी सुद्धा त्यांची क्षमता नव्हती, त्यामुळेच आर्थिक मदत करण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे ठरवण्यात आले. ज्यानुसार, चटई, चादर, तेल, धान्य अशा प्रकारच्या तब्बल 20 ते 25 गोष्टींचे वाटप करण्यात आले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सुद्धा तिवरे गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा केली होती. याविषयी मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती देत गावात शाळा, रुग्णालय आणि मुख्यतः तुटलेली/वाहून गेलेली घरे पुन्हाबांधूं देणार असल्याचे सांगितले होते.