WR Jumbo Block 16 June: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर देखील येत्या रविवारी (16 जून) पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या लोकल लाईनवर दुरूस्तीचं काम पार पडणार आहे. परिणामी काही लोकल्स रद्द होतील तर जलद मार्गावरील वाहतूकही धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.  गर्दीच्या निवडक ठिकाणी वाहनबंदी, 'बेस्ट' बस देणार मोफत सेवा; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सिग्नल, ट्रॅक आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.