खार (Khar) परिसरामध्ये एका घरकाम करणार्या मुलीने चोरी केलेल्या दागिन्याचा फोटो इंस्टाग्राम केला आणि या चोरीचं भांडा फूटल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान नंदिता ठक्कर यांनी तक्रार केली असून इंस्टाग्राम वर फोटो पाहून त्यांनी हा प्रकार तातडीने पोलिसांना कळवला. खार पोलिस स्टेशन मध्ये त्याचा FIR नोंदवला.
ठक्कर यांच्याकडे चोरी करणारी महिला त्यांच्याकडे कामाला होती. नेहमीची घरकाम करणारी नसल्याने ही बदलीची बाई 9 दिवस कामाला आली होती. Mid-Day च्या रिपोर्ट्सनुसार संजन गुजर असं या चोरी करणार्या महिलेचं नाव आहे. तिने ठक्कर कुटुंबाचे 8 लाखांचे दागिने लंपास केले. ही चोरी खार पश्चिमच्या Loknirman Heights मध्ये झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ठक्कर (49) यांनी गुजरला 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान कामाला ठेवलं होतं. ती घरात सफाईचं काम करत होती. 21 जानेवारीला नेहमीची बाई आल्यानंतर गुजर कामावरून निघून गेली.
19 फेब्रुवारीला एका कार्यक्रमाला जाण्याची तयारी करताना ठक्कर यांना 5 सोन्याचे दागिने गायब असल्याच आढळलं. यामध्ये डायमंडची रिंग, कानातले होते. ते हे दागिने कपाटामध्ये ठेवत होत्या, संपूर्ण घर तपासूनही त्यांना हे दागिने सापडले नाहीत. ठक्कर यांनी अन्य कामाला असलेल्या बाईंना प्रश्न विचारले. पण त्यांनीही याची माहिती नसल्याचं सांगितलं. गुजरने देखील त्याची माहिती नाही असं सांगितलं त्यामुळे गुजर यांनी तक्रार केली नव्हती.
10 सप्टेंबर रोजी, इंस्टाग्राम स्क्रोल करताना, ठक्करने गुजरचे चोरीच्या अंगठ्या घातलेले फोटो पाहिले. या शोधामुळे गुजरचा चोरीत सहभाग असल्याचं समोर आलं. ठक्कर यांनी तातडीने खार पोलिसांशी संपर्क साधून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठक्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलीस गुजरने अपलोड केलेल्या इंस्टाग्राम फोटोंची पडताळणी करत आहेत. त्यांनी आरोपी संजना गुजरला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.