Online | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Online Fraud: ऑनलाईन बॅंकिंगमुळे बऱ्याच गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. सध्या प्रचंड लोक त्यांचे आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहारामुळे अनेक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. यातच अंधेरी (Andheri) येथील एका महिलेची मेट्रोमोनी साइटवरून  (Matrimonial Website) फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेट्रिमोनी साइटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने यूकेचा रहिवाशी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्याला अनक्लिअर यूके पाऊंड बाळगल्याप्रकरणी दिल्ली विमानतळावर कस्टमकडून थांबविण्यात आल्याचा दावा करत त्याने संबंधित महिलेकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर महिलेने त्याला पैसे पाठवले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने अज्ञात व्यक्तिविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला (वय, 41) अंधेरी येथील रहिवाशी आहे. तिने मेट्रिमोनी साईटवरून एका व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. आदित्य गणेश असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडून तब्बल 1 लाख 90 रुपये उकळले असल्याचे तिने पोलिसांत सांगितले आहे. अनक्लिअर यूके पाऊंड बाळगल्याप्रकरणी दिल्ली विमानतळावर कस्टमकडून थांबविण्यात आल्याचा दावा करत त्याने तिच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर त्याने तिला वारंवार पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने त्वरीत स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे देखी वाचा- Mumbai Cyber Crime: ऑनलाईन क्लास सुरु असताना Porn Video सुरु; विलेपार्ले परिसरातील महाविद्यालयीन प्राध्यापकाकडून मुंबई पोलिसांत तक्रार

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही कोणत्या बँकेकडे पैसे हस्तांतरित केले आहेत याचा तपशील मागविला आहे. तसेच आरोपींचा कॉल डिटेल शोधण्यासाठी आम्हाला सायबर सेलकडून तांत्रिक सहकार्य मिळत आहे. आरोपीने पीडितेला कस्टम अधिकाऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच त्याला विमानतळावरून सोडण्यात आल्यानंतर तिचे पैसे परत देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे.