Plastic Ban | ( (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Cyber Crime And Financial Fraud: मुंबईतील एका 31 वर्षीय महिलेची एका विवाह वेबसाइटवर भेटलेल्या एका पुरूषाने 4.24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुनील असे या व्यक्तिचे नाव असल्याची प्राथमिकमाहिती आहे. सदर व्यक्तीने मॅट्रीमोनीअल साईटवरुन (Matrimonial Fraud) पीडितेशी संपर्क साधला. हा संपर्क अधिक वाढवून त्याने तिला विश्वासात घेऊन लाखो रुपयांचा गंडा घातला आणि पुढे तिच्याशी संपर्क तोडला. त्याने संपूर्ण संपर्क तोडल्यानंतर पीडितेस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांशी संपर्क साधत फसवणुकीची तक्रार दिली. बांगूर नगर ( Bangur Nagar Police) पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाकल केला आहे.

पीडिता घटस्फोटाच्या प्रतिक्षेत, पतीपासून विभक्त

पीडिता ही तिच्या पतीपासून विभक्त राहात होती आणि घटस्फोटाच्या प्रतिक्षेत होती. घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात प्रलंबित असल्याने ती तिच्या किशोरवयीन मुलसह तिच्या माहेरी परतली होती. दरम्यान, 2023 मध्ये तिने एका ऑनलाईन विवाह जमविणाऱ्या किंवा जोडीदार शोधून देण्यास मदत करणाऱ्या कथीत मॅट्रीमोनीअल साईटवर आपले प्रोफाईल तयार केले. जिथे या महिलेची सुनील नामक व्यक्तीची भेट झाली. दोघांमध्ये झालेल्या संवादात, सुनील याने पीडितेस नाशिक आणि पुण्यात आपली दुकाने असून आपण कपड्याचा व्यापारी असल्याचा दावा केला. शिवाय त्याने पीडितेस सांगितले की, आपला पूर्वी विवाह झाला आहे. परंतू, सध्या तो एकटा राहतो आणि त्याची पत्नी पळून गेली आहे. तो मूळचा वाराणसीचा असल्याचेही त्याने सांगितले आणि आपण सध्या वास्तव्यास मुंबईतील गोरेगाव आणि काळाघोडा परिसरात असल्याची त्याने बतावणीही केली. (हेही वाचा, Marriage Fraud: हैदराबादच्या तोतयाकडून लग्नाचे खोटे आमिष, बँकर महिलेस 38 लाख रुपयांचा गंडा; मुंबई येथील घटना)

गोड बोलणे आणि खोट्या दाव्यांमध्ये पीडितेला अटकवले

सुनील नामक इसमाने पीडितेस नेहमी गोडगोड बोलत अनेक खोटे दावे केले आणि तिच्याकडून पैसे उकळले. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीस त्याने अनेक आश्वासने दिली. त्यानंतरत त्याने 26 जानेवारी 2023 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तिच्याकडे काही पैशांची मागणी केली. नंतर आर्थिक मागणी वाढतच गेली. त्याने पैसे उकळण्यासाठी सांगितलेली कारणे आणि दाखले खालीलप्रमाणे:

  • आजोबांच्या नवी दिल्लीतील एम्स येथे उपचारासाठी पैशांची आवश्यकता.
  • शहादमध्ये मालमत्ता खरेदीसाठी निधीची मागणी करणे.
  • रस्ते अपघातात जखमी झाल्याचा आणि वैद्यकीय खर्चाची आवश्यकता असल्याचा दावा करणे.
  • कायदेशीर शुल्क भरल्यास महिलेला घटस्फोट घेण्यास मदत करण्याची ऑफर देणे.
  • हुंडा, महागड्या भेटवस्तू आणि नवीन सेलफोनची मागणी करणे.
  • कोलकातामध्ये कायदेशीर समस्येतून बाहेर पडण्यासाठी पैशांची मागणी करणे.
  • आरोपीने ब्लॉक केल्यानंततर पीडितेस जाग

दरम्यान, आरोपीने पीडितेकडून चार लाख 4.24 रुपयांची रक्कम उकळल्यानंतर त्याने तिला अचानक ब्लॉक केले. ज्यामुळे पीडितेस  आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि  धक्का बसला. दरम्यान, आरोपीने पीडितेचे पैसेही परत केले नाहीत आणि नातेही कायम ठेवले नाही. शिवाय, त्याने तिला ऑनलाईन ब्लॉकही केले. ज्याचा पीडितेस धक्का बसला. बरेच पैसे दिल्यानंतर पीडितेने त्याच्याकडे पैसे परत मागितले. तिने सांगितले की, तिला तिच्या मुलीच्या शाळेची फी भरायची आहे. त्यामुळे तिला पैशांची गरज आहे. त्यामुळेतिने आरोपीकडे पैसे परत देण्याबाबत विचारणा केली असता, त्याने तिला थेट ब्लॉक केले. ज्यामुळे पीडितेस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि जागही आली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने बांगुर नगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि घोटाळ्याचा तपास सुरू केला. या घटनेमुळे वैवाहिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. जिथे घोटाळेबाज आर्थिक फायद्यासाठी असुरक्षित व्यक्तींचे शोषण करतात. अधिकाऱ्यांनी लोकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करताना सावधगिरी बाळगण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद वर्तनाची तक्रार पोलिसांना करण्याचा सल्ला दिला आहे.