आज (28 ऑगस्ट) ऐन ऑफिसला जायच्या वेळेस पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. तसेच ऑफिसला जाण्यासाठी उशिर होत असल्यान प्रवासी रेल्वेच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त करत आहेत.
पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून वाहतुक विस्कळीत झाल्यास कोणतीही दुसरी उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रवाशी संतापतात. तसेच ऐन ऑफिसच्या वेळेसच हा प्रकार वर्षांनुवर्षे प्रवाशांना अनुभवायला मिळत आहे.
Guys is there a delay in trains on the western railway today?
— T (@tinyysha) August 28, 2019
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे उशिराने असल्याची तक्रार पश्चिम रेल्वेकडे करत आहेत. तसेच काहींनी सांताक्रुझ येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती M-Indicator च्या माध्यमातून दिली आहे.