Rainy Season | Pixabay.com

मुंबई (Mumbai)  मध्ये मे महिन्यात सध्या वादळ आणि पावसाचे दिवस आल्याने 24 तासांत वातावरणामध्ये थेट 7 अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. वातावरणात हा बदल सध्या अल्हाददायक वाटत असला तरीही आजारांना आमंत्रण देणारा ठरू शकतो त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार, 9 मे पर्यंत हा ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. आज, 8 मे आणि उद्या 9 मे पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये अधून मधून पावसाच्या सरी बरसणार आहेत तर मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि वादळी वारा वाहण्याचा अंदाज आहे. आयएमडी ने ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट तर मुंबई ला यलो अलर्ट दिला आहे.

मुंबई मध्ये आज 8 मे दिवशी वादळी वारा, पाऊस बरसण्याचा अंदाज आहे त्यामुळे वातावरण 24 ते 31 अंशांदरम्यान असू शकते. 9 मे दिवशी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर दिवसा कमाल तापमान 32 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 10 मे पासून हवामानात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. 13 मे पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. या काळात, किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील, तर कमाल तापमान हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. 11 मे पर्यंत 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचेल आणि 13 मे पर्यंत ते तसेच राहण्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवसांसाठी हवामानात मोठे बदल; अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.  

मुंबईचे तापामान थेट 7 अंशांनी घटलं

मुंबई मध्ये का कोसळतोय अवकाळी पाऊस?

मुंबईत अवकाळी पाऊस Western Disturbance म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मजबूत वेदर सिस्टिम मुळे होत आहे. जो सध्या वातावरणाच्या खालच्या पातळीवर परिणाम करत आहे. सुरुवातीला मध्य पाकिस्तानवर स्थित असलेली ही प्रणाली नंतर पश्चिम राजस्थान आणि लगतच्या प्रदेशांवर सरकली आहे.

आयएमडीच्या मते, या वादळाचा परिणाम संपूर्ण आठवडाभर कोकण प्रदेशातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.