Winter | (Photo Credits: PTI)

देशभतील विविध राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही उत्तरेतील राज्य तर गारठलीचं आहे. पण आता महाराष्ट्रात देखील कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली असुन आता राज्याची राजधानी मुंबईत देखील गारठली आहे. २०२२ या वर्षभरातील आज सकाळी सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तरी मुंबईत थंडी पडणं हे एक नवलचं. कारण मुंबईत केवळ दोनचं ऋतु आहेत उन्हाळा आणि पावसाळा असं म्हणतात. पण यावर्षी मुंबईत देखील चांगलीच कडाक्याची थंडी पडताना जाणवत आहे. मुंबईतील थंडी बघता मुंबईकरांची मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या सध्या रोडावली आहे. तरी वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांकडून गरम कपड्यांना अधिक मागणी दिसत आहे.

 

किंबहुना मुंबईतील दक्षिण मुंबई भागात सर्वात कमी तापमानाची नोंद गेल्या तीन दिवसात होत आहे. तर त्याच बरोबर पश्चिम मुंबई, मध्य मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तरी मुंबईसह उपनगरात सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभुमिवर मुंबईत पर्यटकांची संख्या वाढली असुन पर्यटक मुंबईत गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना दिसत आहे. (हे ही वाचा:-Winter Skin Care Tips : आला हिवाळा, असे सांभाळा त्वचेला)

 

उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. तरी नाताळानंतर आणि नवीन वर्षापूर्वी मुंबईत आणकीचं थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई प्रमाणेचं राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य माहाराष्ट्रात देखील कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे.