Mumbai Weather Prediction for,29 July: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)आज 28 जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.IMD च्या अंदाजानुसार, मुंबईत सोमवार ते बुधवारपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीएमसीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की शहरात शुक्रवार ते शनिवार सकाळ या कालावधीत झाडे कोसळण्याच्या, अर्धवट घर कोसळण्याच्या आणि शॉर्ट सर्किटच्या 20 घटनांची नोंद झाली. कोणत्याही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत पावसाने आता काहीसी उसंत घेतली आहे. तीन ते चार दिवस संततधार मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली आहे. दरम्यान, पावसाची संततधार कमी (Mumbai Weather Update) झाली असली तरी, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आज यलो अलर्ट जारी केला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा : Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस विश्रांतीवर, शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट; IMD कडून हवामान अंदाज जारी
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.