Mumbai Water Supply Cut: मुंबई शहरात माहीम, माटूंगा, दादर पुढील परिसरात 24 तास पाणीकपात- बीएमसी
Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये पुढचे 24 तास पाणी कपात (Mumbai Water Supply Cut ) असणार आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जी-दक्षिण आणि जी-उत्तर वॉर्डातील अनेक भागांना 27-28 मे रोजी एकूण 26 तास पाणीकपातीचा समाना करावा लागणार आहे. याशिवाय दादर, माटुंगा आणि माहीम परिसरातही पाणीकपात असणार आहे. विविध प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. जलवाहीनीची दुरुस्ती आणि दखभाल, गळती दूर करणे यांसह इतरही काही कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दादर (पश्चिम) परिसरात जलवाहनीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे 27 मे रोजी सकाळी 8.00 वाजलेपासून 28 मे सकाळी 10 वाजेपर्यंत पाणिपुरवठा खंडीत होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, सेनापती बापट मार्, वीर सावकर मा्ग, सेना भवन परिसर, , डेलिसल रोड, BDD, प्रभादेवी, संपूर्ण लोअर परेल परिसर, संपूर्ण माहीम पश्चिम आदी भागांमध्ये अधिक प्रमाणावर जलकपात केली जाईल. याशिवाय ना.म. जोशी मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग आदी भागांमध्येही पाणीकपात असणार आहे.

पाठिमागच्या काही महिन्यांमध्ये जलकपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबई शहराला लागून असलेल्याच नवी मुंबई महानगरपालिकेने 48 तास पाणीकपात केल्याने नागरिकांच्या रोशाला कारणीभूत व्हावे लागले. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पनवेल-कर्जत रेल्वेसाठी चिखले येथील मोरबे मुख्य पाइपलाइन स्थलांतरित करण्याची योजना कार्यन्वीत असल्याने पाणीकपात करावी लागली. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.