Water Crisis | (Photo Credit: File Photo)

मुंबईकरांसाठी(Mumbaikar) महत्त्वाची बातमी! येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत येत्या 5 ते 6 जानेवारी दरम्यान पाणीकपात होणार आहे. 5 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून 6 जानेवारी सकाळी 10 दरम्यान जवळपास 24 तासांसाठी पाणीकपात होणार आहे. मात्र मुंबईतील (Mumbai) काही ठराविक भागांत ही पाणीकपात होणार असून मुंबईत 15% पाणीकपात असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य आणि गरजेपुरता पाणीसाठा करुन ठेवावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणा-या 2400 मिलिमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्होल्व संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्तीसाठी मुंबईत 24 तासांसाठी पाणीकपात होणार आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्र: जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडेही लक्ष द्यावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आरोग्य केंद्रांना सूचना

5 जानेवारी 2021 ला सकाळी 10 वाजल्यापासून हे दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे. मुंबईतील या ठराविक भागांत ही पाणीकपात होणार आहे.

पूर्व उपनगरातील एल.एन.एस मध्ये, मुंबईतील ए,बी,सी,डी,ई, जी/उत्तर व जी/दक्षिण भागात तसेच पश्चिम उपनगरांतील सर्व उपनगरांत ही पाणीकपात होणार आहे.

त्यानुसार मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेऊन त्यानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच महिलांनीही गोंधळून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे. आम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करु असे पालिकेने सांगून होणा-या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त कली आहे.