प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

Mumbai Unlock:  राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 4 जून रोजी रात्री उशिरा राज्य सरकारने अनलॉक संदर्भातील आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार आता राज्यात 5 टप्प्यात अनलॉक होणार असून त्यामध्ये जिल्ह्यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे, अशातच यापूर्वी आधी मुंबई दुसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता राज्य शासनाच्या 'ब्रेक द चेन' आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेने एक ट्विट करत शहरातील अनलॉक तिसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे म्हटले आहे. तर या संबंधित माहिती लवकरच प्रसारित केली जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. पण मुंबईत तिसऱ्या टप्प्यात कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि बंद राहणार याबद्दल येथे अधिक जाणून घ्या.(Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून)

>अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 कालावधीत सुरु

>मॉल्स,थिएटर्स सर्व बंद राहतील

>सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 पर्यंत हॉटेल्स 50% सुरु राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था सुरु (ही सुविधा शनिवार रविवार बंद)

>लोकल,रेल्वे बंद, मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 याकाळात सुरु

>50% क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू

>आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु

>स्टुडियोत चित्रीकरणास सोमवार ते शनिवार परवानगी, मनोरंजन कार्यक्रम 50% दुपारी 2 पर्यंत खुले (सोमवार ते शुक्रवार)

>लग्नसोहळे 50% क्षमतेने सुरु तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा

>बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा

>शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल

>जमावबंदी आणि संचारबंदी कायम

दरम्यान, मुंबईत कोरोनाचे  आखणी 973 रुग्ण आढळले असून 973 जणांनी COVID19 वर मात  केली आहे. तर  तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.