मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) काही दिवसांपूर्वीच विविध परिक्षांचे निकाल जाहीर केले. परंतु विद्यापीठाकडून अद्याप गुणपत्रिका देण्यात न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी मुकावे लागणार का याची चिंता सतावू लागली आहे. तर निकाल जाहीर केल्यानंतर निश्चित केलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देणे बंधनकारक असते.
विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका हातात न मिळाल्याने पुढील अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्यासाठी काहीच अवधी शिल्लक राहिला आहे. त्यात गुणपत्रिका हातात न नसल्याने विद्यार्थी वारंवार विद्यापीठात त्यासाठी खेटे घालत आहेत. त्याचसोबत अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी सांताक्रुझ येथील कलिना युनिव्हर्सिटीत दिसून येत आहे.(मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'मध्ये सावळा गोंधळ; FYBA च्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत भोपळा)
त्याचसोबत विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख 5 ऑगस्ट देण्यात आली आहे. त्यात हा विद्यापीठाचा कारभार पाहता पालक ही संताप व्यक्त करत आहेत. तसेच आयडॉलची सुद्धा स्थिती सारखी असून विद्यार्थी गुणपत्रिबद्दल विचारणा करत आहेत. परंतु गुणपत्रिका लवकरच देण्यात येतील असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येकवेळी सांगण्यात येत आहे.