मुंबईतील (Mumbai) उल्हासनगर (Ulhasnagar) येथे इमारत कोसळली असल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीच जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. महक अपार्टमेंट असे इमारतीचे नाव असून त्याला तडे गेल्याचे निर्दशनास आल्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांना तेथून हलवण्यात आले होते.
इमारतीला तडे गेल्याचे दिसून येताच रहिवाशांनी अग्निशमन दलाला याबद्दल माहिती दिली. या इमारतीत 31 फ्लॅट असून यामधील जवळजवळ 100 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी पाच मजली ही महक अपार्टमेंट ढासळली. मात्र वेळीच इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर केल्यामुळे मोठी दुर्घटना होणे टळले.(गोवंडी परिसरात दुमजली इमारत कोसळली, 8 जण जखमी)
तसेच इमारतीमधील खांब खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी अग्निशमन दलाच्या सहाय्याने घरतील मौल्यवान वस्तू स्वत: सोबत घेत घर रिकामी करण्यास सांगितले. इमारत कोसळेल्या ठिकाणचा भाग मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे.तर काही दिवसांपूर्वी गोवंडी परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळ्याने 89 जण जखमी झाले होते.