Mumbai: जून्या वादातून 2 महिलांनी एका तरूणाची केली हत्या; मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

जून्या वादातून 2 महिलांनी एका तरूणाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) चेंबूरमधील (Chembur) वाशिनाका (Vashi Naka) परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी (RCF Police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सुनील जांभूळकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी सुनील याचे जून्या वादातून आरोपी उषा माने (वय, 22) आणि करूणा माने (वय, 25) यांच्याशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने या दोघींनी सुनीलला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच कापडाच्या तुकड्याने त्याचा गळा आवळला. ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुनीलला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Bihar Shocking: क्रिकेट सामन्यात 'रन आऊट'वरून पेटला वाद, मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीची मैदानातच हत्या

याप्रकरणी पोलिसांनी उषा माने आणि करूणा माने या दोघींनाही अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहे.