Arrested

कोरोनामुळे नोकरी गेल्याने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका 41 वर्षीय महिलेला वसईतील अॅन्टी ह्युमन ट्राफिकिंग सेलकडून अटक करण्यात आली आहे. तर वेश्याव्यवसाय करणाऱ्यासाठी भाग पाडल्या जाणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते पोलीस उपायुक्त प्रकाश निकम हे अॅन्टी ह्युमम ट्राफिकिंग सेल सोबत संपर्कात होते. त्यांना महिलांबद्दल काही माहिती मिळाली. त्याचवेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी भास्कर पुकले यांना या प्रकरणाबद्दल सांगितले. अतिरिक्त आयुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिलेल्या सुचनांनुसा, पुकले यांनी एक बनावट ग्राहक बनवून महिलेला अटक करण्यासाठी पाठवले. अरुणा चव्हाण असे आरोपी महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(Mumbai: ड्रग्स विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला NCB कडून अटक; इन्स्टाग्रामद्वारे जोडत होती नवे ग्राहक)

तपासादरम्यान 21 वर्षीय आणि 23 वर्षीय महिलांची सुटका करण्यात आली. तर या दोघींनी कोरोनामुळे आपली नोकरी गमावली होती आणि त्या घरात एकट्याच कमावणारी व्यक्ती होत्या. त्यामुळे कुठे नोकरी मिळते का याचा शोध घेत असताना आरोपीला त्या काही महिन्यांपूर्वी कुर्ला येथे भेटल्या होत्या. त्यानंतर अरुणा यांनी त्या दोघींना वेश्याव्यवस केला तर खुप पैसे देऊ असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला अरुणाला 2 हजार रुपये दिल्यानंतर त्या दोघींपैकी एकीची निवड करण्यास सांगितले गेले. त्याचवेळी अरुणा हिला अटक करण्यात आली आणि त्या दोन महिलांची सुटका केली गेली.(Ahmednagar Murder: अहमदनगरच्या राहुरी परिसरातील एका पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या)

महिलेच्या विरोधात आयपीएसच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून अरुणाची अधिक चौकशी सुद्धा केली जाणार असल्याचे पुकले यांनी म्हटले आहे. त्याचसोबत अरुणा हिच्यासोबत अन्य कोणी साथीदारांचा या प्रकरणी समावेश आहे का याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.